जळगाव: राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी तसेच प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आदेशानुसार औरंगाबाद येथील शारिक नक्शबंदी औरंगाबाद एमआयएम शहर अध्यक्ष व त्यांचे सहकारी मुबीन टोपीवाला व ज़ीशान पटेल आज रविवार दिनांक २०/०७/२०२५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे अजिंठा गेस्ट हाऊस जळगाव येथे सकाळी 11 वाजता ते जिल्ह्यातील एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर दुपारी २:०० वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करणार. करिता जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पक्ष प्रेमींनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.