Friday, May 19, 2023

BYF अध्यक्ष शीबान फाईज़ यांनी BYF तांबापूर युनिटच्या अध्यक्षपदासाठी युसूफ खान यांच्या नावाची घोषणा केली.

20/05/2023
जळगाव : BYF ब्राईट युथ फाऊंडेशन जळगाव शहरात झपाट्याने आपले पाय रोवत आहे आणि सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.  शनिवार 20 मे 2023 रोजी, BYF अध्यक्ष शीबान फाईज़ यांनी BYF तांबापूर युनिटच्या अध्यक्षपदासाठी युसूफ खान यांच्या नावाची घोषणा केली आहे.  यावेळी संस्थाचे उपाध्यक्ष अक्रम देशमुख, सचिव उमर फारूक, सोशल ग्रुपचे अध्यक्ष समीर खान, सोशल मीडियाचे अध्यक्ष रिजवान शेख आदी उपस्थित होते.  जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी अधिकाधिक काम करणे हा BYF चा उद्देश आहे जेणेकरून विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठ मिळू शकेल.  BYF सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, क्रीडा, मानवी हक्क या क्षेत्रात जळगाव शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी व तरुणांसाठी काम करणार आहे.

एमआयएमचे जळगाव जिल्हा निरीक्षक शारिक नक्शबंदी साहेब आज जळगावात

   जळगाव: राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी तसेच प...